---|| राजे ||---

Tuesday, September 28, 2010

---|| संभाजींच्या मातोश्री - सईबाई ||----

                                          सईबाई निंबाळकर (मृत्यू :- ५ सप्टेंबर १६५९.)

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री.

जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून .

सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या ,
परंतु संभू राजे लहान असतानाच सईबाईंचा मृत्यू झाला.

सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते.
छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला
तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते.
त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता .
त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नीहोत्या.

त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली .
संभू राजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे .

मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.
सईबाईंना संभाजींच्या अगोदर तीन मुली होत्या .

त्यातील एका कन्येचा (" सखुबाई") विवाह सईबाईंच्या भावाचा मुलगा बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी झाला .

संभाजींचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, संभू राजे २ वर्ष्यांचे असतानाच आपल्या मातोश्रीनपासून दुरावले होते. पुढे संभू राजांना त्यांच्या आज्जी व शिरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले.

---|| शिवजन्म ||---

सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरीवर भगवाही होता खेळत ,
येणार्‍या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाउल ...


मराठ्यांचा प्रत्येक आश्रू
जिजाउन साठवला होता ,
आई भवानीस तेच आश्रू देऊन
पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता ...


मंदिर थराराली , शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळुक दर्‍या खोर्‍यात दरवळली ,
जिजाउपोटी मराठ्यांचा राजा अवतरला
सांगत मुकी पाखरही किलबीलली ....


नगारा वाजला ,शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला ,
आता सह्याद्रीवर भगवा फडकनार
मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार ....


इतिहासच पाहील पान
शिवजन्मान लिहाल गेल होत ,
हिरव्या दगडावर आता भगवे रक्त
स्वराज्याचा इतिहास कोरत होत!
- श्याम वाढेकर

---|| एक ज्वलंत व्यक्तिमत्व ||---

छत्रपति संभाजी, एक ज्वलंत व्यक्तिमत्व, शिवरायांचा छावा.थोरले छत्रपति, सईबाई
आणि जिजाउंच्या
काळजाचा तुकडा।
येसूबाई दुर्गाबाईंच्या
कपाळी चमकणारा
महातेजस्वी भास्कर, ज्याला आपल्या ओंजळित
घेताना मृत्यु
सुद्धा हळहळला
असेल, प्रत्यक्ष
यमधर्माचेही डोळे पाणावले असतील, आपल्या
देहदानाने महाराष्ट्राला जीवदान देणारा आणि
मरणोत्तर मराठी
माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा,
*****संभाजी राजा*******

---|| हर हर महादेव ||---

होताच अवचित स्फोट, धुरांचे लोट,
भडकले चहुदिशेस पलिते
विषण्ण सुन्न आभाळ, धाडे तत्काळ,
मावळा, मेघांचे खलिते
यवनांनी साधला डाव, घातला घाव, आणिली वेळ समराची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची

सागराची गाज, दडपेन आज,
दर्पोक्ती बाळगे उरी
भ्याडांचा माज, शिखंडी बाज,
आलेच कसे या धरी ?
बोलविते ते धनी, आहे जे कुणी,
खात्रीने मुर्ख शंभरी
चाळलाच असता, इतिहास नुसता,
नसतेच चढले पायरी
महाराष्ट्र भुमी, ठेचतेच कृमी, आहे नोंद काळपर्वाची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची

गवताचे भाले, निमिषात झाले,
मरहट्टे रक्त सांडती
सह्याद्रीसाठी, हिमालयापाठी,
दख्खनही धावे मागुती
मुषक ते टिपले, बिळात लपले,
देऊन स्वंये आहुती
शहिदांच्या गजरा, मानाचा मुजरा,
नतमस्तक येथे धरती
पण आहेत अजूनी प्यादी, गैर अवलादी, दडलेली जात्यंधाची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची

बाघाच्या जबड्यात, घालूनी हात,
मोजतील कसे हे दात ?
कैसे जन्मा येती, वीर त्या प्रती,
या अशा षंढ पाकात
हिरवी पिलावळ, फक्त वळवळ,
ही एवढीच औकात
नेस्तनाबुत, करण्या हे भुत
पुरे एक आघात
जाहले बहूत इशारे, फुरफुरणारे, छाटावी जात गारद्यांची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची.

Topic Link
http://www.marathimehfil.com/?q=node/49

---|| संभाजी राजा - एक दंतकथा ||---

छत्रपती संभाजी राजांबद्दल एक कथा सांगितली जाते.
औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे संभाजीराजांची हत्या केली. मात्र तत्पूर्वी त्याने त्यांना, तू मुसलमान होतोस का, असं विचारलं होतं. त्यावर संभाजीराजांनी मोठ्या बाणेदारपणे त्याला उत्तर दिलं, ""तुझी जुलपुकार बेगम ही मुलगी मला देतोस, तर मी धर्मांतराला तयार होतो!''
ही जी कहाणी आहे ती मोठ्या अभिमानाने, संभाजीराजांची धर्मनिष्ठा अधोरेखीत करण्यासाठी सांगितली जाते. बखरकारांनी अगदी रंगवून रंगवून ही कथा सांगितली आहे. पण ही गोष्ट मुळातूनच खोटी आहे. कोणाही समकालिन लेखकाने या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. साकी मुस्तईद खानाने "मआसिरे आलमगिरी'त अथवा भीमसेन सक्‍सेनाने त्याच्या "तारीख-ए-दिलकुशा' या ग्रंथात अशा भाकडकथांचा उल्लेख केलेला नाही.
संभाजीचा जन्म 14 मे 1657चा. मृत्यु 11 मार्च 1689चा. मृत्युसमयी त्याचं वय 32 होतं. त्यावेळी औरंगजेबाच्या पाचांपैकी दोन मुली लग्नाच्या होत्या. त्यातील जेबुन्नीसा ही संभाजीपेक्षा 19 वर्षांनी मोठी होती आमि जिबतुन्नीसा ही 14 वर्षांनी मोठी होती.
सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे औरंगजेबाला जुलपुकार नावाची मुलगीच नव्हती! मुळात हे नाव पुरूषाचं आहे!!
संदर्भ : http://khattamitha.blogspot.com/2008/02/blog-post_25.html

---|| थोडस महत्वाच ||---

*****कोणतीही गोष्ट करताना, त्यातील यश- अपयश , 
फायदा- तोटा  याचा विचार करू नका . 
कारण ती गोष्ट करताना तुमच्या मनाला,
मिळालेले समाधान महत्वाचे असते.*************

Tuesday, September 21, 2010

---|| वढू बुद्रुक आणि तुळापूर ||---

तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. तुळापुर आळंदी पासून साधारण १४ किमी वर, तर पुण्यापासून अंदाजे ३० किमी वर आहे.
वढू बुद्रुक आणि तुळापूर भीमा नदीतीरावरची पवित्र स्थळे . या दोन गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. हीच ती भूमी जिथे संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार झाले. औरंगजेबाने ज्या क्रुरतेने संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले, त्या सर्व इतिहासाची साक्षीदार हि भूमी. नकळत इतिहासात घेऊन जाणारी हि भूमी

वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक मराठी माणूस हादरून गेला. संभाजी राजांचा अंतिम संस्कार रीतीने व्हायला पाहिजे आशेच सर्वाना वाटत होते. वढू च्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव धोक्यात घालून, भीमा ओलांडून आणि मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिम संस्कार केला. असेच तुळापूरलाही घडले.

इतिहास आणि पर्यटन या दोहोंचा इथे सुरेख मिलाप झालाय ...... पराक्रमाने , शौर्याने पावन झालेली हि भूमी आहे. शिवपुत्र संभाजीची हि भूमी आहे.










संदर्भ : http://www.globalmarathi.com/GlobalMarathi/BlogDetails.aspx?BlogId=5421410614524659173&OId=5502788118444389516

Thursday, September 9, 2010

---|| थोडस महत्वाच ||---

** देवळात वेळ घालवण्या पेक्षा,
    काही तरी नवीन निर्माण करत राहा .
    देवाने तुम्हाला तुमच्या हातून काहीतरी,
    नवीन घडवण्यासाठी निर्माण केले आहे.
   आणि त्याच्याच मागे तुम्ही पळत राहिला तर,
   त्याच्या दृष्टीने तुमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही.***