---|| राजे ||---

Thursday, April 15, 2010

---|| शंभुराजे साकारायचय ||---


शंभुराजे साकारायचय
आयुष्यात एकच स्वप्न शंभुराजे साकारायचय
तो शुर सिंहाचा छावा हातुन एकदा तरी आकारायचय
मरणाला न भिणारी कधी आमी मराठ्याची पोर
शाहिर सुद्धा सांगुन गेल ही होती सर्वांच्या म्होर
बघतोयस काय असा टकामका लवुन मुजरा कर
शुर संभाजी पुढे आहे बोला एकसुरात हरहर
हातात भगवा घेउन पुढे खंडोबाचा मळवट भाळी
एकदाची स्वारी निघाली ठोकुन त्वेषाने आरोळी
येतो आम्ही काळजी नसावी जिंकण्याची हौस डोळी
निघतो एकदाचा शुर तो चिखल काटे पायदळी
झुंजविले औरंगजेबालाही ज्याने म्रुत्यु त्याच्यापुढे फिका
कुशाग्र शक्तिशाली शंभु जिंकण्यास ना शत्रुस कधी मोका
समशेर हाती घेताच लोपत होत्या चंद्र तारका
असा हा सिंहाचा छावा मराठ्यांचा होता सखा
बलिदान जाईल वाया त्याचे केले जर दुर्लक्ष
रक्त सांडलय मराठयांसाठी नेहमीच होता दक्ष
पन घात केला काळाने डाव एकदाचा साधला
जगदंबा जगदंबा शेवटचे बोल मुखावाटे वदला
नेहमीच असायचा पुढे जरी होता तो राजा
मैदान सोडायचा नाही कधी उडविल्याशिवाय शत्रुचा फ़ज्जा
सात वर्षे नाही ठेवुन दिला कुणा मायभुमीत पाय
एकदातरी शंभुराजे साकारायचाय माघार घेणार नाय
_____
जितु

शिवाजी राजेंना vote करा

click and vote
http://www.whopopular.com/Chatrapati-Shivaji-#vitthalraje

Wednesday, April 7, 2010

--|| संभाजीराजांचे बलीदान ||--


संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !

संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो. १५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल', असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला. शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे. संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला. २७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.
शिवाजी आणि संभाजी हे आहेत महाराष्ट्र धर्माचे मूलमंत्र ।
जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।

---|| शम्भू राजे ||---

------------शम्भू राजे----------------
शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!

बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी ,
सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!

माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!

धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत , शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!

रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!!

गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान , आप्त्स्वकियानिच त्याचा घाट रचला होता ,
पैस्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!


डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता |
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता !!!

पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई शम्भुराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने " जग्दम्भ !! " म्हणत हिन्दवी शब्दच उच्चारला होता
हिन्दवी शब्दच उच्चारला होता ....... !!!!