---|| राजे ||---

Tuesday, September 21, 2010

---|| वढू बुद्रुक आणि तुळापूर ||---

तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. तुळापुर आळंदी पासून साधारण १४ किमी वर, तर पुण्यापासून अंदाजे ३० किमी वर आहे.
वढू बुद्रुक आणि तुळापूर भीमा नदीतीरावरची पवित्र स्थळे . या दोन गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. हीच ती भूमी जिथे संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार झाले. औरंगजेबाने ज्या क्रुरतेने संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले, त्या सर्व इतिहासाची साक्षीदार हि भूमी. नकळत इतिहासात घेऊन जाणारी हि भूमी

वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक मराठी माणूस हादरून गेला. संभाजी राजांचा अंतिम संस्कार रीतीने व्हायला पाहिजे आशेच सर्वाना वाटत होते. वढू च्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव धोक्यात घालून, भीमा ओलांडून आणि मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिम संस्कार केला. असेच तुळापूरलाही घडले.

इतिहास आणि पर्यटन या दोहोंचा इथे सुरेख मिलाप झालाय ...... पराक्रमाने , शौर्याने पावन झालेली हि भूमी आहे. शिवपुत्र संभाजीची हि भूमी आहे.










संदर्भ : http://www.globalmarathi.com/GlobalMarathi/BlogDetails.aspx?BlogId=5421410614524659173&OId=5502788118444389516

No comments:

Post a Comment