---|| राजे ||---

Saturday, July 25, 2015

---|| हि करारी नजरच सांगते कि कसा होता माझा शंभू राजा ||---


हि करारी नजरच सांगते कि कसा होता माझा शंभू राजा

हि पोलादी छातीच सांगते कि किती असेल या छातीत आग
उभ्या आयुषा मध्ये एक हि लढाई हरली नाही तो कसा असेल
शंभू राजा

असेल का कोणाची हिम्मत नजरेला नजर मिळवायची
होईल का कोणाची हिम्मत समोर उभे राहण्याची

अरे शिव पुत्र असा होता कि लाखो मोघल हि
संभाजी नाव घ्यायला घाबरत होते

औरंगजेब सारख्या सैतानाणे हि गुढगे टेकले
माझ्या शंभू राजा पुढे

अरे ज्याने स्वराज्य साठी बलिदान दिले
हात तोडले डोळे काढले जीभ कापली
शीर छेद केले तरी हि झुकला नाही हा शंभू राजा
ते फक्त या शिवरायांच्या स्वराज्या साठी या मराठी
आस्मीते साठी

अरे तक्ता साठी रक्तावर उलटनारी जात नाही
शेवटी औरंगजेब बोलून मेला
ये संभाजी शेर शिवा का छावा था

गेली ३५० वर्ष झाली ज्यांच्या इतिहासाला
हि जनता विसरू शकत नाही

कसा घडविला असेल त्यांनी इतिहास
केली असेल का जीवाची पर्वा केल असेल
स्वत: साठी काही
नाही केले त्यांनी जे केले ते या स्वराज्यातील रयते साठी
या महाराष्ट्राच्या च्या माती साठी

जन्म संपेल माझा पण सांगून नाही संपणार या शंभूराजावर
असा होता हा शिव पुत्र शंभू राजा

मग फक्त विचार करा कसा असेल तो
शिव पुत्र शंभू राजा
आणि मगच जय शंभूराजे म्हणा .....

हर हर महादेव
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

लेखक कवी :- अजयसिंह घाटगे सरकार
 
संदर्भ : http://ajaysinhghatge.blogspot.in/2015/02/blog-post_19.html

Thursday, November 20, 2014

---|| गोवेकर पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढाई ||---

     गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले.   
पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर “काउंटी दि अल्वोरे” याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळेच संभाजी महाराजांना माहित होते कि गोव्यात शिरून पोर्तुगीजांवर आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल. त्यामुळेच या गव्हर्नर ला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा बेत संभाजी राजे अखात होते. गोव्याजवळील फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी राजांनी ठरवले कि गोव्याच्या पोर्तुगीजांना याच किल्ल्यावर येणे भाग पाडायचे.
ठरलेल्या बेतानुसार शंभूराजांनी स्वतःच्या माणसांकडून गोव्यात अफवा पसरवण्यास सुरुवात केली कि “गोव्या जवळील फोंडा किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी ५ कोटींचा खजिना आणून ठेवला आहे, त्याच बरोबर बराचसा दारुगोळा हि जमा करून ठेवला आहे.” या वेळी संभाजी महाराज रायगड  किल्ल्यावर होते. गव्हर्नर ला हि बातमी माहित होती. गव्हर्नर ला माहित होते कि फोंडा किल्ल्याची तटबंदी मजबूत नाहीये. आणि किल्ल्यावर जास्त सैन्य सुद्धा नाहीये. त्याने विचार केला कि फोंडा किल्ल्यावर थोडेच मावळे आहेत, आणि मराठ्यांचा छत्रपती पण जवळ नाहीये. त्यामुळेच त्याला जोर आला आणि तो फोंडा किल्ल्यावर आक्रमण करायला निघाला. गव्हर्नर संभाजी राजांच्या गनिमी काव्यात बरोबर अडकला. त्याने आपल्या बरोबर ५ हजाराचे पोर्तुगीजी सैन्य घेतले आणि फोंडा किल्ल्यावर आक्रमण केले.

गव्हर्नर आपले पोर्तुगीजी सैन्य घेवून किल्ल्याजवळ पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. अंधार पडला होता. पण त्याने ठरवले कि सकाळ पर्यंत वाट बघायची नाही, रात्रीच किल्ल्यावर आक्रमण करायचे. त्याने रात्रीच किल्ल्यावर चढाई केली. किल्ल्यावर कृष्णाजी कंक आणि येसाजी कंक हे पिता पुत्र किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी किल्ल्यासमोरच्या एका टेकडीवर तोफा चढवल्या. या फिरंगी तोफा लांब पल्ल्याच्या होत्या. या टेकडी वरूनच ते मराठ्याच्या फोंडा किल्ल्यावर तोफ तोळे डागत होते. त्याच बरोबर पोर्तुगीजी सैनिक गोळ्या सुद्धा चालवत होते.
दुसऱ्या दिवशी पर्यंत हा मारा सुरु होता, त्या मार्याने फोंडा किल्ल्याच्या तटबंदीचा एक बुरुंज ढासळला होता. ते पाहून गव्हर्नर खुश झाला. त्याने आपल्या सैन्याला किल्ल्यामध्ये शिरण्याचा हुकुम दिला. पण किल्ल्यावरून होणाऱ्या मराठ्यांच्या माऱ्यापुढे एकही पोर्तुगीजी सैनिक पुढे सरकायला तयार नव्हता. पण गव्हर्नर च्या रेट्यापुढे त्याचे काही चालेना. मग काही पोर्तुगीज पुढे झाले आणि किल्ल्याजवळ आले. किल्ल्यावरून दगडांचा मारा झाला. मग मात्र पोर्तुगीज मागे हटले.   
पण तरीही सलग ४ दिवस त्या टेकडीवरून किल्ल्यावर तोफांचा मारा चालू होता. खरी परिस्थिती अशी होती कि अजून एखाद्या दिवसात किल्ला पोर्तुगीजांच्या हातात जाणार होता. पोर्तुगिजांचा गव्हर्नर तर याच खुशीत वेडा झाला होता. त्याला तर फोंडा किल्ल्यावर पोर्तुगिजांचा झेंडा दिसू लागला होता. किल्ल्यावरचे मावळे येसाजी कंक यांच्या हुकुमाप्रमाणे प्राणांची शर्थ करून किल्ला लढवत होते.
आणि इतक्यात…. दुरून, काही अंतरावरून धुळीचे लोट दिसू लागले, ललकाऱ्या ऐकू येवू लागल्या, “हर हर महादेव, शिवाजी महाराज कि जय, संभाजी महाराज कि जय”
फोंडा किल्ल्यावरचे सगळे मावळे तत्बाडीवर आणि बुरुंजावर उभे राहून तिकडे पाहू लागले… क्षणा क्षणाला तो आवाज वाढत होता. खुद्द शंभू राजे येसाजी कंकांच्या मदतीसाठी आले होते. ते पाहून किल्ल्यावारूनही त्यांना प्रतिसाद दिला गेला, किल्ल्यावरून घोषणा उठू लागल्या, “संभाजी महाराज कि जय ||”   
संभाजी महाराज, त्यांचे घोडदळ, पायदळ, सारी सेना आली होती फोंडा किल्ला राखायला, पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चाखवायला. पोर्तुगीजांना पण हे लक्षात आले, मग मात्र त्यांचे धाबे दणाणले, भीतीने त्यांची गाळण उडाली. आत्ता पर्यंत गव्हर्नर ने संभाजी महाराजांचे पराक्रमाचे किस्से फक्त ऐकले होते, आज साक्षात त्यांनाच समोर बघून गव्हर्नर पूरता घाबरून गेला, खचून गेला. त्याने लगेच आपल्या सैन्याला मागे फिरण्याचा आदेश दिला. पोर्तुगीजी सैन्य देखील याच आदेशाची वाट बघत होते, आदेश मिळताच तेही पाठीला पाय लावून पळत सुटले.  किल्ल्यावरील मावळे हे दृश्य पाहून फारच आनंदित झाले.   
गोव्याचा गव्हर्नर Count De Alwore याला मराठ्यांनी जेरीस आणून सोडले होते.
मराठ्यांचे गोव्यावरील आक्रमण इतके जबरदस्त होते कि, गोव्याच्या गव्हर्नर ला त्याची राजधानी पणजी पासून खाली मार्मा गोव्याला हलवावी लागली.
संभाजी महाराज यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गोवेकर पोर्तुगीजांची केलेली वाताहत पाहून गोव्यातील मराठी लोक खूप आनंदित झाले. गोव्यातील कित्येक लोक वर्षानुवर्षे पोर्तुगिजांचा जाच, त्रास छळ आणि अत्याचार सहन करत होते. कित्येक वर्षानंतर आज ते स्वातंत्र्याचा आनंद घेत होते. मागील काही वर्षात पोर्तुगीजांनी गोव्यातील कित्येक देवळे उध्वस्त केली होती, याचाच सूड घेण्यासाठी गोव्यातील काही हिंदू लोक एकत्र आले आणि त्यांनी गोव्यातील ख्रिश्चनांच्या एका चर्चवर हल्ला केला, त्या चर्च ची तोडफोड आणि जाळपोळ सुरु केली. हि बातमी शंभू राजांच्या कानावर आली, परंतु स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान आणि परधर्माबद्दल आदर असलेले संभाजी राजे यांना हि बातमी आवडली नाही. ते म्हणाले, “आमच्या आबासाहेबांनी स्थापन केलेले हे स्वराज्य कोणाच्या धर्माच्या द्वेषावर उभे राहिलेले नाहीये.” छत्रपती संभाजी महाराज यांनी हुकुम दिला कि, “ताबडतोब चर्च ची जाळपोळ थांबवा”. शंभू राजांच्या आज्ञेचे पालन केले गेले. संभाजी महाराज यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या काही हिंदु लोकांना धर्मात परत घेतले.
गव्हर्नर आधीच पणजी सोडून गेला होता, त्याला खात्री होती कि संभाजी महाराजांना पराभूत करणे अश्यक्य आहे. त्याला भीती होती कि शंभूराजे एक न एक दिवस पूर्ण गोवा जिंकून घेतील. म्हणूनच त्याने ठरवले कि संभाजी महाराज यांच्या बरोबर तह करून आपला जीव वाचवायचा. यासाठीच गव्हर्नरने आपला वकील शंभू राजे याच्याकडे पाठवला होता. यानंतर काही दिवसातच संभाजी राजे यांनी पोर्तुगिजांबरोबर तहाची बोलणी केली. आणि ते रायगड ला परत आले.

संदर्भ :- http://sambhajiraj.blogspot.in/2013/03/blog-post_2974.html

---|| छत्रपती संभाजी महाराज राजमुद्रा ||---

 
 
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
 



                                                             मराठी मध्ये अर्थ:
                                            शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व
                                            ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त
                                            अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही
                                           (कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)

Saturday, November 23, 2013

---|| संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ ||---

संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ

ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव — बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्री गणेशाला नमन
  देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं  तं नमामि भवबालकरत्नम् ||
मराठी मध्ये अर्थ:
देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, द्रुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
रत्ने धारण करणारा, शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
  कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः |
जगतः पतिरंशतोवतापोः  (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः  |
मराठी मध्ये अर्थ:
कलिकारुपी भुजंग घालीतो  विळखा,  करितो धर्माचा ऱ्हास.
तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बुधभूषणम् या ग्रंथाच्या लेखनास सुरुवात करताना. 
  तस्यात्मजः शंभुरिति प्रसिद्धः समस्तसामंतशिरोवतंसः |
यः काव्यसाहित्यपुराणगीतकोदण्डविद्यार्णवपारगामी ||
विविच्य शास्त्राणि पुरातनानामादाय तेभ्यः खलु सोयमर्थम् |
करोति सद्ग्रंथममुं नृपालः स शंभुवर्मा बुधभूषणाख्व्यम् ||
मराठी मध्ये अर्थ:
– त्या शिवाजी राजांचा – भोवतीच्या साऱ्या राजेलोकांना शिरोभूषण वाटणारा,
काव्य, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र – ‘शंभूराजे’ या
नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी
शंभू हा ‘बुधभूषणम्’ नावाचा सद्ग्रंथ रचीत आहे.

संदर्भ : http://www.chhatrapatisambhaji.com/sambhaji-sanskrit-granth/

Saturday, July 27, 2013

---|| संभाजी महाराज - जंजिरा लढाई ||---


 


उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले. त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावरआक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारणखवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे. याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला. कोण होता हा कोंडोजी फर्जद ? हा होता हिरोजी फर्जदांचा मुलगा. आग्रा भेटीत शिवाजी महाराजांचे सोंग घेवून झोपलेले हिरोजी. संभाजी राजांनी कोंडोजीच्याकानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धीसमोर आला, आणि त्याने सिद्धीला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली सिद्धीला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राज्यांकडे होते. संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते. दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले. पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, “डागा तोफा किल्ल्यावर. मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच. पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्याहाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडीच्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले..........

--|| राघवेंद्र उत्तरवार (फेसबुक) ||--