---|| राजे ||---

Tuesday, January 19, 2010

---|| आई ||---

असं लहान आम्ही अजून किती दिवस रहायचं...

असं लहान आम्ही अजून किती दिवस रहायचं...
आई सांगणा आम्हाला
असं लहान आम्ही अजून किती दिवस रहायचं...
शाळा चालू झाल्यावर पावसाळ्यात
पुस्तक भिजण्याचं कारण सांगून
एकुलती छत्री आम्हला देवून
तू भिजत भिजत शाळेपर्यंत सोबत यायचं
आम्ही नाही भिजलोत म्हणून
समाधान मानत तसंच
परत भिजत भिजत घराकडे जायचं
थंडीने गारठा भरूनही
पुन्हा कामाला लागायचं
आम्ही घरी येताच
आम्हाला जेवू घालायचंस
आणि काही शिल्लक नाही
म्हणून तू उपाशीच रहायचस
आई सांगणा हे अजून कुठवर चालायचं...
कोणाकडे पाहून आम्ही खेळणं मागताच
ते चांगलं नाही
आपण त्याहून चांगलं घेऊ
म्हणून आम्हाला समजवायचं
आणि नंतर आम्ही झोपी जाता
तू मूकपणे आसवं गाळायचं
दिवाळीला आम्हाला नवीन कपडे देवून
तू जुन्यातच समाधान मानायचं
माझ्या बाळांना सारं सुख मिळावं
हेच स्वप्नं नेहेमी उराशी जपायचं
संसाराचे चटके सोसून आम्हाला
नेहेमी मायेच्या उबेतच ठेवायचं
सांगणा आई हे अजून कुठवर चालायचं...
असं लहान आम्ही अजून किती दिवस रहायचं...
--पवन---

No comments:

Post a Comment