
कोरेगाव-भीमा येथून डाव्या बाजूला काही अंतरावर वढू-बुद्रुक लागते.
पहाटे ६:४५ ला वढू-बुद्रुक मध्ये संभाजी राजांच्या समाधी स्थळी पोहचलो,
समोर संभू राजांची मूर्ती पहिली नी पावले तिकडे आपसूक वळली,
संभाजी राजांच्या भव्य - तेजोमय अश्या पुतळ्याचे दर्शन घेवून
आम्ही समाधी कडे वळलो .पहाटेची वेळ असल्याने तेथील संभू राजांची
पूजा करण्यासाठी "भोसेकर " नावाची व्यक्ती आली होती, येतील कोणी ना कोणी रोज संभाजी राजांची पूजा करतात.

पूजा करण्याचा मान मिळाला . संभाजी राजांच्या समाधी स्थळी
पाणी वाहताना संभाजी राजांनी धर्मासाठी केलेले बलिदान आठवले ,
त्यांच्या समाधीस स्पर्श करताना अंग थरथरले, मन स्थब्द झाले.
काही वेळ तेथेच बसून राहिलो. काही वेळाने त्यांच्या भव्य
अश्या पुतळ्यास हार घालून त्यांचे चरण स्पर्श केले .
त्यानंतर कवी कलस यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

तटबंदीचे काम चालू होते, तसेच संभू राजांचे चरित्र शिल्प रुपात बनवण्याचे
काम चालू आहे, हे सर्व काम लोकवर्गणीतून चालू आहे , त्यामुळे अजून २ वर्षे
तरी काम पूर्ण होण्यास लागतील. संभाजी राजांच्या समाधीचे दर्शन घेवून
आम्ही ८ वाजता तुळापुर कडेरवाना झालो . लोणीकंद मधून आतमध्ये
७-८ किलोमीटर वरती तुळापुर लागते, आम्ही तिथे पोहचलो. तिथे प्रवेश करताच
आम्हाला तिथे बनविलेली बाग दिसली आणि आतमध्येच उपहार गृह दिसले,
जे तिथे नको होते. तेथील संभू राजांची समाधीचे दर्शन घेतले, बगिच्यामुळे नी
उपहार गृहामुळे समाधी स्थळाचे वेगळेपण हरवले आहे.
तेथूनच त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. तिथेच संगमेश्वरचे मंदिर आहे.
तेथे दर्शन घेवून आम्ही आमच्या परतीच्या वाटेकडे रवाना झालो.