---|| राजे ||---

Monday, May 14, 2012

" शिवपुत्र संभाजी राजांची आज जयंती. शंभू राजांना मानाचा मुजरा "


" शिवपुत्र संभाजी राजांची आज जयंती. शंभू राजांना मानाचा मुजरा "

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर स्वतः औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. १३ नोव्हेंबर १६८१ या दिवशी नुकताच महाराष्ट्राच्या सीमेवर पोहचला. संध्याकाळी मुक्कम करण्यासाठी मोगलांची वस्तू सोडासोडी, चूल मांडामांडी चालू असतानाच स्वतः संभाजी राजांनी शाही डेरया पासून पाच ते सात मैलावर असणाऱ्या लुत्फुल्ला खानाचा संपूर्ण तळच लुटला. औरंगजेबाच्या ७ लाख लष्कराच्या उपस्थितीत मराठ़यांनी हा छापा घातला तरी मोगलांना काहीच करता आले नाही.
      तेंव्हा शहा आलमने आपल्या बापाला आठवण करून दिली. अब्बाजान मी दख्खनच्या सुभेदारीवर असताना शिवाजीने छापा घातला तर आपण सेवेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवून मला त्या पदावरून बरखास्त करून माघारी बोलावले. आता तुमच्या उपस्थितीत अगदी जवळ हा प्रकार घडला त्यावेळी आपण निष्काळजी तर अजिबात नसाल आणि शाही शेवेत हलगर्जीपणा तर अजिबात केला नसेल.
      परंतु तरीही मराठ़यांनी तळावर छापा घातलाच. आता कसे करावे ? मराठे काय चीज असतात हे कळलेच असेल. मनात म्हणाला हुशार आणि शहाणे असाल तर आताच परत या नाहीतर मेल्यावरही हे मराठे तुम्हाला आग्र्याला पोहचू देणार नाहीत. एवढे भयंकर असतात हे मराठे आणि त्यांचा गनिमी कावा.

संदर्भ: प्रा. नामदेवराव जाधव यांच्या "गनिमी कावा" या पुस्तकातून. 


No comments:

Post a Comment