---|| राजे ||---

Monday, February 18, 2013

---|| कासा उर्फ पद्मदुर्ग ||----

 file:///C:/Documents%20and%20Settings/sghare/Desktop/gallery_det%20(1).jpg
कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कासा किल्ला मुरुड गावा जवळील समुद्रात आहे. मुरुड हे गाव तालुक्याचे असून ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मुरुड हे जंजिरा या जलदुर्गामुळे प्रसिध्दच आहे. या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत. मुरुड गावातून राजपुरीकडे  जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनार्यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्याकडे चौकशी केल्यास यातील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेवून जावू शकते आपण संख्येने जास्त असल्यास फारसा आर्थिक भार पडत नाही. सागराची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार कासाकडे येण्यासाठी तयार होतात. आपण आगावू चौकशी करुन किंवा आदल्या दिवशी जर नौका ठरवली तर वेळेची बचत होऊन गैरसोय टळू शकते.
जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाला होतात्याच्या आरमारी सामर्थ्याने त्याने किनारपट्टीवर धाक जमवला होतासामान्य रयतेची पिळवणूक होत होतीत्यामुळे सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजीराजांनी मुरुडच्या सागरात असलेल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतलात्यानुसार कासा उर्फ पद्मदुर्ग हा लदुर्ग बांधलात्याबद्दल महाराजांनी उद्गार काढलेपद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिराउरावरी दुसरी राजापुरी उभी केली हेकासा किल्ल्यामुळे जंजिर्याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद सलाएकदण्यापासून किंवा राजापूरीपासून नावेने तासाभरात आपण कासा किल्ल्याला पोहोचतो.  कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्यकिल्ला आणि त्यासमोरील पडकोटपडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे परंतु मुख्यकिल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तम पैकी शाबूत आहेमुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे.  या बुरुजाच्या चर्चा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे फुललेल्या आकाराच्या आहेतम्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे
कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळतेतटबंदीच्या दोन दगडांमद्ये सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आहे.  गेल्या साडेतीनशे वर्षामध्ये ागराच्या लाटांच्या तडाख्याने णि खार्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहेया दगडाची झीज पाच ते दहा से.मीएवढी झाली आहेतरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहेशिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करतेपडकोटामधील चौकोनी विहीरतोफाइमारतींचे अवशेष असे पाहून आपण मुख्यकिल्ल्याकडे निघायचे पडकोट आणि मुख्यकिल्लायामधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंखशिंपल्यांचा ढीग साचलेला आहेकासा किल्ल्याच्या महाव्दारामध्ये प्रवेश करण्यासाठी चारपाच पायर्या चढाव्या लागतातदाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्याच्यासाठी केलेल्या देवडय़ा आहेतकिल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्यांचा मार्गही आहेमधल्या भागामध्ये नव्याजुन्या वास्तूचे अवशेष पहायला मिळतातकाहीकाळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकी वजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसतेचारही बाजुंनी खारे पाणी असताना आतमध्ये गोडय़ा पाण्याची चार टाकी केलेली दिसताकिल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचेस्थापत्य पाहून परत फिरायचेतटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतातमुरुडचा किनारा ही उत्तम दिसतो
मुरुडला जाण्यासाठी अलिबाग रेवदंडा मुरुड असा एक गाडी मार्ग आहेमुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे गाठावे रोह-चणेरे बिरवाडी मार्गे मुरुडला जाता येतेतसेच मुंबई-पणजी महामार्गावरील इंदापूर येथून तळा-भालगावमार्गे ही मुरुड गाठता येते.

संतोष घारे
[गर्जा महाराष्ट्र माझा]

1 comment:

  1. Best New & Used Casino Near Portland
    Looking for new & 서귀포 출장안마 used casino 이천 출장샵 in Portland? of the casino near 수원 출장샵 Portland (see the map 충주 출장마사지 below). casino 익산 출장샵 near me. casino near me. riverport casino near me. riverport casino

    ReplyDelete