कितीही आली संकटे , तटस्तपने लढू , छत्रपती शिवरायांच्या या पावन शिवभूमीत, शंभू राजांप्रमाणे घडू. शिवचरित्रा मधून संस्कार देवू नव्या पिढीला , घडवू प्रत्येक मावळा , शंभू चरित्रातून . ---|| शंभू राजांना त्रिवार मुजरा ||---
Tuesday, May 18, 2010
---|| जंजिरा किल्ल्यास भेट ||---
रविवारी १६ मे २०१० रोजी आम्ही जंजिरा किल्ल्यास भेट दिली. या किल्ल्याविषयी आमच्या मनात असणारे सर्व विचार तेथील सागरात वाहून गेले. ज्याचा आम्ही विचारही करू शकत नव्हतो , ते आमच्या पुढे घडत होते. आमची कार पार्किंग पासून सुरवात झाली, समुद्राच्या किनार्यावरती पार्किंग केल्यानंतर पार्किंगचे पैसे घेण्यासाठी मुसलमान माणूस होता. तेथून पुढे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटीतून जावे लागते त्यासाठी फक्त एकच ऑफिस तेही मुसलमानाचे , तिकीट २०/- प्रत्येकी. बोट चालवणारे त्यांचेच लोक. जेंव्हा बोटीतून किल्ल्याजवळ पोहचलो तेंव्हा त्यांनी फक्त ४५ मिनिटात बोटीजवळ येण्यास सांगितले, अन्यथा पुन्हा बोट मागवण्यासाठी ६००-८०० रुपये पडतील म्हणून सांगितले, आत गेल्यानंतर गायीड सुद्धा त्यांचाच त्याने प्रत्येकी ३०/- सांगितले, आणि इतिहास त्याच्या मनाप्रमाणे सांगितला, आम्ही त्याच्याबरोबर गेलो नाही, आम्ही फास्ट मध्ये किल्ला बघून घेतला , परंतु जे गायीड बरोबर होते त्यांना अर्धाच किल्ला दाखवून वेळ संपल्याचे सांगून बोटीवरती आणले गेले. बोटीमध्ये बसल्यानंतर बोटीत चढवण्यासाठी असणार्या लोकांनी त्यासाठी पैसे मागितले. आणि आम्ही गाडीजवळ पोहचलो. तिथे मुसलमानाचे अस्तित्व , किल्ल्यात असणारे त्यांचे दर्गे त्यामुळे किल्ला पाहण्याचा आमचा उस्ताह निघून गेला. तेतून काही अंतरावर शिवरायांनी बांधलेला "पद्मदुर्ग" पाहण्यास मिळाला, परंतु तिथे घेवून जाण्यास कोणीच तयार झाले नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment