---|| राजे ||---

Wednesday, March 23, 2011

---|| राजा शिवाजी ||---

नगार्‍यांच्या नादात शिवनेरी आनंदला
आई जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास आला
पराक्रमाचा बादशाह महाराष्ट्री अवतरला
एकची तो राजा शिवाजी जाहला

हजारो मावळे उभे ठाकले,दिसली नवी आशा
मर्दमराठी पराक्रमाने दुमदुमल्या दाही दिशा
तोफांसमोरी तलवार घेऊनी उभा ठाकला
एकची तो राजा शिवाजी जाहला

उरी बाळगूनी स्वप्न हिंदवी स्वराज्याचे
बांधूनी तोरण हजारो गड-किल्ल्यांचे
घडविले ज्याने नव्या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला

राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला

                                                 --- श्वेता देव ---

संदर्भ :  http://marathikavita.co.in/index.php?topic=4930.0

2 comments:

  1. nice..
    chhatrapati shivaji maharaj ki jay......!!!!

    ReplyDelete
  2. सांगा ओरडून हे राज्य माज्या शिवबाचे
    आहे..||
    एकच जयघोष..,
    "हर हर महादेव"
    अन पाखरे सारी जमा झाली..,
    राजे तुमच्या खातर..||
    ती पाखरे सारी..,
    गर्जता वनराज बनली ||
    एकच ध्येय...हिंदवी स्वराज्य...,
    एकच छत्र...भगवा झेंडा..||
    पाठीशी...आईचा आशीर्वाद...
    अन शिवशंभुंचे बळ..||
    लाखोंच्या उमेदीचे बळ हत्तीचे..,
    जिजाऊंच्या चुड्याची ताकद..,
    व अनेकांचे बलीदान..||
    बस...राजे तुमच्यासाठी..,
    हा प्राणही कवडीमोल..||
    ।। जय शिवराय ।।
    ।। जय महाराष्ट्र ।।

    ReplyDelete