शिवकालात फलटण संस्थान हे मोठे मातब्बर.ह्या संस्थानाचे शिवकाळातील अधिपती बजाजीराजे नाईक निंबाळकर हे तो शिवाजी महाराजांचे व्याही. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -
“विजापुरच्या आदिलशहाने त्यास विजापुरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले, नंतर ते देशी परतले व आपल्या केलेल्या कर्मांचा त्याना पश्चाताप झाला, बजाजीराव ह्यांची छत्रपती शिवाजी महाराजानी शिखर शिंगणापूर येथे शुद्धि करून घेतली, त्यानंतर काही दिवसानी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”
सत्य असे की धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय ?
हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काही सुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात, त्या हिशोबे त्याचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत नाहीच तर याच दरम्यान त्यांचा उल्लेख हा हिन्दू म्हणूनच केला जातोय, ते ही चक्क समकालीन कागद पत्रामंधे, पाहूया जरा हे समकालीन पुरावे -
१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, पहिले त्याचा संदर्भ पाहूया -
शिवभारत – अध्याय १३- श्लोक १०
घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायक: |
तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायक: ||
या मधे कविन्द्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख ” बाजनायक ” असा करतात, शिवभारता मधे येणारा हा उल्लेख १६४८ मधल्या प्रसंगाचा आहे जेव्हा स्वराज्यावर फतहखानाचे संकट आले आहे. कविन्द्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हटले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यावनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे.कविन्द्र परमानंद हे महाराजांचा निकटवर्तीय आहेत.तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे.
२) एक छोटी कैफियत आहे निंबाळकर घराण्याची जी १८२२ मधे लिहली गेली, ती बापूसाहेब निंबाळकर यांच्या दफ्तरात सापडली, त्यात एक उल्लेख आहे की बजाजीरावांनी १६५१ मधे बेगम (विजापूरची बडी बेगम ?) हिच्याकडून फलटणची सनद घेतली.इथेही बजाजीरावांचे नाव हिंदूच तसेच त्यांच्या धर्मांतराचा काहीही उल्लेख नाही.“विजापुरच्या आदिलशहाने त्यास विजापुरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले, नंतर ते देशी परतले व आपल्या केलेल्या कर्मांचा त्याना पश्चाताप झाला, बजाजीराव ह्यांची छत्रपती शिवाजी महाराजानी शिखर शिंगणापूर येथे शुद्धि करून घेतली, त्यानंतर काही दिवसानी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”
सत्य असे की धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय ?
हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काही सुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात, त्या हिशोबे त्याचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत नाहीच तर याच दरम्यान त्यांचा उल्लेख हा हिन्दू म्हणूनच केला जातोय, ते ही चक्क समकालीन कागद पत्रामंधे, पाहूया जरा हे समकालीन पुरावे -
१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, पहिले त्याचा संदर्भ पाहूया -
शिवभारत – अध्याय १३- श्लोक १०
घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायक: |
तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायक: ||
या मधे कविन्द्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख ” बाजनायक ” असा करतात, शिवभारता मधे येणारा हा उल्लेख १६४८ मधल्या प्रसंगाचा आहे जेव्हा स्वराज्यावर फतहखानाचे संकट आले आहे. कविन्द्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हटले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यावनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे.कविन्द्र परमानंद हे महाराजांचा निकटवर्तीय आहेत.तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे.
३) बजाजीराजे निंबाळकर १६५९ मधे अफजलखान स्वारीच्या वेळी फलटण मधे होते, त्यास अफजलखान याने पकडले व त्याची सुंता करून ठार मारण्याची धमकी दिली त्यावेळी अफजलखानाकडील मराठी सरदार ” नाइकजीराजे पांढरे ” यांच्या मध्यस्थिने बजाजीराजे निंबाळकर यांच्याकडून ६० हजार होनांची खंडणी घेउन अफजलखानाने त्यांना सोडले.
ह्या संदर्भातील अस्सल पत्र खाली देत आहोत -
” धनकोनाम जयचंदीभाई व जमामाव बाबानभाई मुक्काम मलवडी यास रिणकोनाम बजाजी नाइक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाइक निंबाळकर देशमुख परगणे फलटण…कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसाजे बदल खान आजम आबदलाखान ( अफजलखान ) यासी पातशहानी साहेबी शिवाजी राजेवारी मसलत केलि. ते वख्ति आबदलाखान कुचावर कुच करून मलवडी उतरले, ते वख्ति अम्हाबद्दल शिवाजी राजे यानि नाइकजी राजेस ( नाइकजीराजे पांढरे) बहुत प्रकारे कागद लिहला होता आम्हास दस्त करून गल्यात तोफ घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाले घालून मारावे, तो नाइकजी राजे यांनी बहुत काही आडमुड होउन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजरावारी करार करून, होन साठी हजारावर दरम्यान नाइकजी राजे पांढरे जमान होउन सोडिवले
साक्षीदार – रतनजी माने देशमुख कसबे मह्सवड, मलजी राजे पांढरे, रविराव ढ़ोणे, जाधवराव देशमुख दौलताबाद, धूलाजी राजे सडगे, देवजी राजे धायगुड़े, तानाजी राजे काकरे, दत्ताजी माने देशमुख कर्यात मलवडी, विठ्ठल भालेरावजी दीवाण निरत नाइकजी राजे पांढरे ”
( शिवकालीन पत्रसारसंग्रह – खंड – २ – लेख.क्र. – १७९७ )
जर इ. स . १६५९ मधे अफजलखान बजाजीराजे नाइक यांची सुनता करायची धमकी देतो तर ह्यावरून काय सिद्ध होते की – १६५९ च्या अगोदर बजाजी निंबाळकर यांची सुनता झालीच नव्हती, कारण जर ती झालेली असती तर अफजलखानाने तशी धमकी बजाजीस दिलीच नसती.
सारांश बजाजीराजे निंबाळकर हे मुसलमान झाले होते ह्या विधानाला काहीही पुरावा नाही.
|| लेखन सीमा ||
--|| विशाल खुळे ||--
संदर्भ : http://raigad.wordpress.com या ब्लॉग वरून
No comments:
Post a Comment