---|| राजे ||---

Tuesday, January 4, 2011

---|| बालपनी भुकेल्या वाघाला उभा फाडला ||---

तुलापूरी कैद झाला वीर, धर्मभास्कर, खरा झुंजार,खरा झुंजार,
संभाजी हो छावा शिवाजीचा, तिलक देशाच्या सौभाग्याचा
शिपाई भगव्या झेंडयाचा जी जी जी जी

बालपनी भुकेल्या वाघाला उभा फाडला,
ठार ज्यान केला

वीर तो तुरुंगात बसला
औरन्गजेब खद्खदुन हसला
आणा म्हणे सामने काफराला जी जी जी

जखडउनी बेड्या पायाला,
खेचून डोर दंडाला
महाराणा तिथे आणिला
ताठायात पुढे येउन वीर ठाकला
बेफिकिर चेहरा पाहून शाहा गांगरला जी जी जी

तबियत हाय का ठीक आपकी बोले कपटाने
होकाराची मान हलवली शूर मराठ्याने
बच्चे जैसा तू है मुझको समझ बात मेरी
जब मानोगे कहना मेरा दूंगा सरदारी

भुवया चढ़वून संभाजीने कथिले मग त्याला
काय सांगता बोला आलमगीर स्पष्टपने बोला

पथ्हर पूजा करनेवाला धर्म छोड़ तेरा
आणि प्यारा खुदाका धर्म इस्लामी लेले तू मेरा

भडकला संभाजी मानी जीभ चावुनि
बोले गर्जुनी प्यारा तुझा धर्म असेल तुजला
माझा ही धर्म प्यारा मजला
धर्मासाठी मरीन प्रसंगाला जी जी जी

रागाने जाहला लाल, डोळे इनगळ,दुनावले बळ
फुगविता दंड दूबले ठरले बंद सरे तटातट तुटले
शिपाई सारे गडबडले जी जी जी

चटपटे बादशहा मनी, तेज पाहुनी, आवाज चढ़वुनि
बोले परी उसन्या अवसानान,अरे संभाजी कुत्त्याच्या मरशील मौतिन
बोलू नको मान उंचावुन जी जी जी

संभाजी वीर चेतला, चावून ओठ बोलला
थेरडया आवर जिव्हेला, संभाजी कोण वाटला ?
तुझ्यासारख्या दिन दुबळ्याला, मराठ्याच्या पुजलय पाचवीला
ये जरा सामने हिरवा खातो तुला जी जी जी

काफरा म्हणे शंभूला, ह्या क्षणी मारिन तुला
शेवटच्या ऐक वचनाला, हो मुसलमान समयाला
जीवदान देवूनी करीं सरदार तुला जी जी जी

संभाजी हसून बोलला
सरदारी ठेव शिलकेला नाहीतर वाट कोल्ह्या कुत्र्याला
तुझी बेटी देवून मला जावाई जरी त्वा केला
लाथेच्या ठोकरीन उडविन त्या मोहाला जी जी जी

काटा याची जीभ उमटले शब्द बादशहाचे
हाती भाले धरून धावले गुलाम तुकड़याचे
जीभ कापन्यापूर्वी छावा सिंहाचा वदला
" हिन्दू धर्म की जय " तयाचा नाद नभी भरला
जिव्हा तुटली, वाचा मिटली तरी नयन त्याचे
पेटपेटुनी सांगत होते बीज मराठ्याचे
डोळे ही काढा याचा, जाहला हुकुम शहाचा जी र हा जी र र जी जीजी
अंगात खुपसले भाले धरणीवर राजा लोळे जी र हा जी र र जी जीजी
जिवाची विझली ज्योत, राहिले तेज दुनियेत, तेज दुनियेत हा जी जी जी
धर्मासाठी पाचप्राण ते पणास लावावे
संभाजिचे नाव अमर ते नंतर मग घ्यावे
तुलापुरी त्या धर्मवीराच्या समाधीच्या वरती
अमर पिराजी हीच लावितो मिनमिनती पणती
---- शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक ( कोल्हापूर) 

No comments:

Post a Comment