---|| राजे ||---

Tuesday, January 4, 2011

---|| बलिदान तुमचे शंभूराजे ||---

बलिदान तुमचे शंभूराजे
जाणारच नव्हते वाया ,
सह्याद्रीपुत्र सरसावला नव्याने
भगवा घेवून जग जिंकाया !
 
रक्ताच्या थेंबाने भिजलेली
हि माती गाते गाथा ,
शिवबा पुत्र शेर होता
काळ ही थरथरला होता !

लढा स्वराज्याचा विलक्षण
"सईपुत्र" एकाकी लढला होता ,
भिनलेले बाळकडू रक्तात स्वराज्याचे
जिजामातेने शेर घडवला होता !

"शिव"सूर्य अस्ताला जाताना
सर्वशक्तीनिशी मोगल संकटदारी
दुफळी माजली स्वराज्यात
तरी नाही हटला माघारी !

खोटे डाग दिले इतिहासाने
"येसु"पतीच्या शुभ्र चारित्र्यावर ,
हि मराठी माती देते साक्ष
होते कुभांड पवित्र धर्मवीरावर!

स्वाभिमानी, गुणी, महापराक्रमी
तेजपुंज वीरपुरुष तो झाला ,
शत्रू समोर उभा ठाकता
जो होवुनी अंगार बरसला !

धर्मासाठी नरक सोसला
बेभान वादळ सह्याद्रीच होत ,
अमर जाहला धर्मवीर शंभू
पेटवूनी "धर्मज्योत" हृदयात

हिम्मत नव्हती कळीकाळाची
उभी समोर ठाकण्याची ,
खरी निशाणी "शंभूच" आहे
आजही मराठी बाण्याची ! 
 -----------------------------------------||| बाजी दराडे ||-------

No comments:

Post a Comment