---|| राजे ||---

Saturday, March 30, 2013

---|| शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच ||---

हो आम्ही शिवजयंती तारखेनुसार म्हणजे १९ फेब्रुवारीलाच साजरी करतो...कुणाला काही प्रश्न असतील त्यांनी न वाद घालता खालील पोस्ट अवश्य वाचावी...

छञपती शिवराय महाराज यांची जन्मतिथी ही १९ फेब्रुवारी १६३०  ही असुन त्यासंबधी संदर्भ खालीलप्रमाणे
1) जेधे शकावली -इ स १९०८ च्या सुमारास जेधे शकावली दाजीसाहेब जेधे देशमुख यांच्याकडुन उपलब्ध झाली,त्यातिल नोँद "शके १५५१ शुक्लनाम संवत्सरे फाल्गुन वद्द तृतिया शुक्रवार नक्षञ हस्ता घटी १८ पळ ३१ गंड 5 पळे ७ ये दिवशी राजश्री शिवाजी राजे शिवनेरीस उपजले"

2) तंजावरचा शिलालेख-१८०३ मध्ये राजेभोसले वंशावळीचा शिलालेख आहे त्यात देखिल शक १५५१ असाच उल्लेख आहे.

3)परमानंदक्रत संस्क्रत भाषेतील शिवभारत-तंजावर येथील सरस्वती महाल palace ग्रंथालयसंग्रहालय तंजावर हस्तलेख बी १४०९ या क्रमांकावर शिवभारत ग्रंथाची नोँद आहे,यात तिथी सांकेतिक शब्दात सांगितलेली आहे-"भूबाण प्राण चन्द्राब्दै : सम्मिते शालिवाहने| शके संवत्सरे शुल्के प्रव्रत्तेचोत्तरायणे||२६|| शिशिरर्तो वर्तमाने प्रशस्ते मासि फाल्गुने | कृष्ण  पक्षे त्रतीयायां निशि लग्ने सुशोभने || २७ || अनुकुल तरै स्तुंग संव्प्रयै: पचंमिर्ग्रहै: | व्यजिताशेष जगती स्थिरसा साम्राज्य वैभवम्|| २८ || ....सुषुवे साभ्दुदे सुतम || ३१ || याचा मराठी अनुवाद "शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे उत्तरायणात शिशिर ऋतू  मध्ये फाल्गुन वद्ध ञतियेला राञी शुभलग्नावर ,अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकुल व उच्चीचे असताना तिने अलौकिक पुञ रत्नास जन्म दिला"

4) शिवभारताची तामिळ भाषेतील नक्कल-इ स १९१८ मध्ये इतिहास संशोधक श्री स म दिवेकर याना तंजावर येथील सरस्वती महाल लायब्ररीत शिवभारत नावाच्या एका ग्रंथाची ताडपञावर लिहिलेली तामिळ भाषेतील प्रत मिळाली,त्यातिल जन्मतारिख जेधेशकावली व शिवभारत यातिल तारिख तंतोतंत उतरते

5) व्यावर(राजपुताना) जन्मकुंडली- इ स १९२५ मध्ये श्री गौरीशंकर हीराचंद ओझा यानी राजस्थानात व्यावर येथे मिळालेल्या एका जुन्या जन्मपञिका संग्रहातील शिवराय महाराजांची जन्मपञिका उजेडात आणली,ब्यावर येथिल निवासी मिठालाल व्यास याचे वंशज ज्योतिषी चंडु यांच्या जुन्याबाडात मिळाली,तिचा लेखक शिवराम ज्योतिषी हा छञपती शिवराय महाराज यांच्या समकालीन होता,त्यात "सवंत १८६६ फाल्गुन वद्द 3 शुक्रे ऊ घटी ३०/९ राजा शिवजन्म र १०/२३ ल ४/२९" अशी आहे,हे देखिल शिवभारताशी जुळते...


---|| अमोल काटे ||---

संदर्भ :- http://www.facebook.com/photo.php?fbid=261091140694120&set=at.108010469335522.10820.100003797078821.1474527579&type=1&theater

No comments:

Post a Comment